A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
थंड थंड अशी हवा

थंड थंड अशी हवा
हवेमधे गंध नवा
हात तुझा हाती हवा, याहुन काही नको !

सांज अशी ही धूसर श्यामल
श्वासांवर दरवळतो परिमल
मनी तुझ्या प्रीतीची चाहूल, याहुन काही नको !

वसंत येथे सदा असावा
फुलांतुनी अनुराग हसावा
कणाकणांतून तोच दिसावा, याहुन काही नको !

ही हिरवी मखमल, हा वारा
ह्या थुईथुई नाचती जलधारा
एक झोपडी हाच निवारा, याहुन काही नको !