ठाऊक नाही मज काही
ठाऊक नाही मज काही !
ठाऊक आहे का तुज काही,
कशि होती रे माझि आई?
मऊ जशी ती साय दुधाची
होति आई का तशि मायेची?
बागेतील ते कमल मनोहर
आई होति का तशीच सुंदर?
देवाघरि का एकटि जाई?
ठाऊक आहे का तुज काही,
कशि होती रे माझि आई?
चिउकाऊची कथा चिमुकली
सांगत होती का ती सगळी?
अम्हांसारखे शुभंकरोती
म्हणे रोज का देवापुढती?
गात असे का ती अंगाई?
ठाऊक आहे का तुज काही,
कशि होती रे माझि आई?
मऊ साइहून आई प्रेमळ !
गंगेहून ती आहे निर्मळ
अमृताचे घांस भरविते
आभाळापरि माया करिते
आईवाचुन मीही विरही
ठाऊक आहे का तुज काही,
कशि होती रे माझि आई?
ठाऊक आहे का तुज काही,
कशि होती रे माझि आई?
मऊ जशी ती साय दुधाची
होति आई का तशि मायेची?
बागेतील ते कमल मनोहर
आई होति का तशीच सुंदर?
देवाघरि का एकटि जाई?
ठाऊक आहे का तुज काही,
कशि होती रे माझि आई?
चिउकाऊची कथा चिमुकली
सांगत होती का ती सगळी?
अम्हांसारखे शुभंकरोती
म्हणे रोज का देवापुढती?
गात असे का ती अंगाई?
ठाऊक आहे का तुज काही,
कशि होती रे माझि आई?
मऊ साइहून आई प्रेमळ !
गंगेहून ती आहे निर्मळ
अमृताचे घांस भरविते
आभाळापरि माया करिते
आईवाचुन मीही विरही
ठाऊक आहे का तुज काही,
कशि होती रे माझि आई?
गीत | - | मधुसूदन कालेलकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | स्नेहल भाटकर, वसुमती दोंदे |
चित्रपट | - | एक धागा सुखाचा |
गीत प्रकार | - | बालगीत, आई, चित्रगीत |
Print option will come back soon