ती पहा ती पहा बापुजींची
ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती
तारकांची सुमनमाला देव त्यांना वाहती
झुंजला राजासवें हा, रंगला रंकासवें हा
पेटतां देहेहि आतां दिव्यता दावुनी जाती
चंदनाचें खोड लाजे, हा झिजे त्याहूनही
आज कोटी लोचनींच्या अश्रुमाला सांडिती
पृथ्वीच्या अक्षांशीं लाली, पृथ्वीच्या रेखांशीं लाली
चार गोळ्या ज्या उडाल्या दशदिशांना कापिताती
नांव ज्यांचे ऐकुनिया थरकली सिंहासने
ना जरी तलवार हाती, हा अहिंसेचा पुजारी
सत्य मानी देव आणि झुंजला खोट्यासवें
मृत्युच्या अंतीम वेळी नांव रामाचें मुखीं
सिंधु गंगा आणि यमुना धन्य झाली अस्थिंनी
राख तुझी भारताच्या तिलक झाली रे ललाटी
तारकांची सुमनमाला देव त्यांना वाहती
झुंजला राजासवें हा, रंगला रंकासवें हा
पेटतां देहेहि आतां दिव्यता दावुनी जाती
चंदनाचें खोड लाजे, हा झिजे त्याहूनही
आज कोटी लोचनींच्या अश्रुमाला सांडिती
पृथ्वीच्या अक्षांशीं लाली, पृथ्वीच्या रेखांशीं लाली
चार गोळ्या ज्या उडाल्या दशदिशांना कापिताती
नांव ज्यांचे ऐकुनिया थरकली सिंहासने
ना जरी तलवार हाती, हा अहिंसेचा पुजारी
सत्य मानी देव आणि झुंजला खोट्यासवें
मृत्युच्या अंतीम वेळी नांव रामाचें मुखीं
सिंधु गंगा आणि यमुना धन्य झाली अस्थिंनी
राख तुझी भारताच्या तिलक झाली रे ललाटी
गीत | - | मनमोहन नातू |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | गजानन वाटवे |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
अक्षांश | - | Latitude. |
रेखांश | - | Longitude. |
ललाट | - | कपाळ. |
सुमन | - | फूल. |