ती पाहताच बाला
ती पाहताच बाला कलिजा खलास झाला
छातीत इष्क-भाला की आरपार गेला
स्वर्गातल्या पर्यांना की वस्त्रगाळ करुनी
कमनीय देह विधीने रचिला तिचा छबेला
लावण्य काय सारे उकळोनि वा पिळोनी
त्या मस्त अत्तराचा भरला गमेचि बुधला
डौलात चालता ती, हत्ती वनात झुलती
रस्त्यात गुंड जमती तिज अन् पहावयाला
छातीत इष्क-भाला की आरपार गेला
स्वर्गातल्या पर्यांना की वस्त्रगाळ करुनी
कमनीय देह विधीने रचिला तिचा छबेला
लावण्य काय सारे उकळोनि वा पिळोनी
त्या मस्त अत्तराचा भरला गमेचि बुधला
डौलात चालता ती, हत्ती वनात झुलती
रस्त्यात गुंड जमती तिज अन् पहावयाला
गीत | - | प्र. के. अत्रे (केशवकुमार) |
संगीत | - | छोटा गंधर्व |
स्वराविष्कार | - | ∙ पंडितराव नगरकर ∙ गजानन वाटवे ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | लग्नाची बेडी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • स्वर- पंडितराव नगरकर, संगीत- छोटा गंधर्व, नाटक- लग्नाची बेडी • स्वर- गजानन वाटवे, संगीत- दादा चांदेकर, चित्रपट- ब्रह्म घोटाळा (१९४९ सालचा हा चित्रपट आचार्य अत्रे यांच्या 'लग्नाची बेडी' या नाटकावर आधारलेला आहे व निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांचेच आहे.) |