तिमिरातुनी तेजाकडे
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना
ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना
दे मुक्तता भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयानिलासम भावना
ने दीपदेवा जीवना
ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना
दे मुक्तता भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयानिलासम भावना
गीत | - | कुसुमाग्रज |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | |
नाटक | - | ययाति आणि देवयानी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, प्रार्थना |
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |
मलयानिल | - | मलय पर्वतावरून येणारा वारा. |