तो म्हणाला सांग ना
तो म्हणाला सांग ना गे मी तुझा ना साजणी
ती म्हणाली रत्न राया मी तुझ्या रे कोंदणी
तो म्हणाला प्रेम म्हणजे वेड मजला वाटते
ती म्हणाली गोड अन् ते ओढ जीवा लाविते
तो म्हणाला भावनेचे खेळ सारे नाचरे
ती म्हणाली जीवनाचा भावना आधार रे
तो म्हणाला प्रीत करिते दो जीवांची एकता
ती म्हणाली होय ना? मग का अशी ही दूरता?
ती म्हणाली रत्न राया मी तुझ्या रे कोंदणी
तो म्हणाला प्रेम म्हणजे वेड मजला वाटते
ती म्हणाली गोड अन् ते ओढ जीवा लाविते
तो म्हणाला भावनेचे खेळ सारे नाचरे
ती म्हणाली जीवनाचा भावना आधार रे
तो म्हणाला प्रीत करिते दो जीवांची एकता
ती म्हणाली होय ना? मग का अशी ही दूरता?
गीत | - | शांताराम आठवले |
संगीत | - | केशवराव भोळे |
स्वर | - | गजानन वाटवे, लीला पाठक |
चित्रपट | - | दहा वाजतां |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
कोंदण | - | दागिन्यातील हिरे वगैरे भोवतीची घडण. |