A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तो सलीम राजपुत्र

प्रीतीची आसवे पत्थरांत पाझरली
तो सलीम राजपुत्र, नर्तकी अनारकली

अनोळखी शिपाइगड्या एकदाच पाहिले
शूराच्या चरणावर मस्त हुस्‍न वाहिले
इष्काच्या दरबारी चांदरात बरसली

बंड करुन उठली तलवार सलीमाची
राजनिष्ठ राजबीज आस मोंगलांची
अकबरच्या न्यायकसोटीस प्रीत उतरली

ते शराबी नैन कधी कुणा नाही डरले
राजा वा रयतेला ना कधीच घाबरले
मीलनाच्या वाटेवर भिंत जरी बांधली

अल्लाच्या दरबारी दोन पाखरे जुळी
पंख मिटून मूकपणे चढली एका सुळी
तो पतंग ती शमा एकसाथ जाळली
गीत- अनिल भारती
संगीत - गजानन वाटवे
स्वर - गजानन वाटवे
गीत प्रकार - भावगीत

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  गजानन वाटवे