तोचि खरा साधू
रंजल्या जिवाची गांजल्या जिवाची
मनी धरी खंत
तोचि खरा साधू, तोचि खरा संत
गोरगरिबांना धरूनिया पोटी
पुसूनिया आसू घास देई ओठी
पुण्यवान ऐसा धरी मोक्षपंथ
जगाचे कल्याण हीच खरी भक्ती
उपकार सेवा हीच खरी मुक्ती
ठायी ठायी त्याची रूपे ही अनंत
अंधारात होई आंधळ्याची काठी
पांगळ्याला घेई आपुलिया पाठी
जनीजनार्दनी पाहे भगवंत
मनी धरी खंत
तोचि खरा साधू, तोचि खरा संत
गोरगरिबांना धरूनिया पोटी
पुसूनिया आसू घास देई ओठी
पुण्यवान ऐसा धरी मोक्षपंथ
जगाचे कल्याण हीच खरी भक्ती
उपकार सेवा हीच खरी मुक्ती
ठायी ठायी त्याची रूपे ही अनंत
अंधारात होई आंधळ्याची काठी
पांगळ्याला घेई आपुलिया पाठी
जनीजनार्दनी पाहे भगवंत
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | रामलक्ष्मण |
स्वर | - | सुधीर फडके, उत्तरा केळकर |
चित्रपट | - | हीच खरी दौलत |
गीत प्रकार | - | चित्रगीत, स्फूर्ती गीत |
ठाय | - | स्थान, ठिकाण. |
रंजलेगांजले | - | त्रासलेले, पीडलेले. |