A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तूं बोलल्याविना मी

तूं बोलल्याविना मी नाहींच बोलणार
बोलाविल्याविना ना पाऊल टाकणार

पुसल्याविना स्वयें तूं नाहींच सांगणार
पाहून रीत तूझी तैसाच वागणार !

लहरी मनांस तूझ्या मी कोणत्या उपायें-
रिझवूं शकेन, याचि ना कल्पना मना ये

झालीस या जिवाची जर तूं कधीं धनीण,
होईन आपुलें कां आयुष्य सौख्यपूर्ण?