A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तू बुद्धि दे तू तेज दे

तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे

जाणवाया दुर्बलांचे दु:ख आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना
धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे, झेपावण्या आकाश दे
गीत- गुरु ठाकूर
संगीत - राहुल रानडे
स्वर - विभावरी आपटे-जोशी
चित्रपट- डॉ. प्रकाश बाबा आमटे
गीत प्रकार - चित्रगीत प्रार्थना
खल - अधम, दुष्ट.
रंध्र - छिद्र / व्यंग / उणीव.

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  विभावरी आपटे-जोशी