A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तू दूर दूर तेथे

तू दूर दूर तेथे, हुरहुर मात्र येथे
विरहात रात्र मोठी प्रेमी जनास वाटे

शब्दात सांगु कैसे ते दुःख अंतरीचे
ओलावले दंवात हे काठ पापण्यांचे
भरला स्वरात कंप, कंपात भाव दाटे

मी भाबडी मनाची आहेच स्वप्‍नवेडी
विरुनी तुझ्यात जावे ही एक आस वेडी
राहो अभंग प्रीती, राहो अभंग नाते

भाळावरी असे हे सौभाग्य लाल कुंकू
विक्राळ काळ येता दोघे तयास जिंकू
स्फुरता मनात आशा ओठांत गीत येते
गीत - मधुकर जोशी
संगीत - यशवंत देव
स्वर- आशा भोसले
गीत प्रकार - भावगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.