A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तू जपून टाक पाऊल जरा

जीवन सुखदु:खाची जाळी, त्यात लटकले मानव कोळी
एकाने दुसर्‍यास गिळावे, हाच जगाचा न्याय खरा,
हीच जगाची परंपरा!

तूं जपून टाक पाऊल जरा । जीवनातल्या मुशाफिरा ॥

पापपुण्य जें करशिल जगतीं । चित्रगुप्त मागेल पावती
पापाइतुकें माप ओतुनी । जे केले ते तसें भरा ॥

निरोप जेव्हा येईल वरचा । तेव्हा होशिल सर्वांघरचा
तोंवर तूं या रिपु जगाचा । चुकवुनि मुख दे तोंड जरा ॥

दानव जगति मानव झाला । देवाचाही दगड बनविला
कोण कोठला तूं तर पामर । चुकून तुझा करतील चुरा ॥

 

Random song suggestion
  भालचंद्र पेंढारकर