A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तू माणूस वेडा

पुन्हापुन्हा तू कशास बघसी आरशांत मुखडा
तुझे तुला प्रतिबिंब सांगते तू माणूस वेडा

दया-धर्म तू कधी न केला
देव मंदिरी कधी न पुजिला
पैसा पैसा जमवून भरला पापाचा तू घडा

कुटिल नीतिचा तू तर कपटी
तुझी नाटकी भाषा खोटी
गंगेतुनही स्‍नान करुन तू असशी रे कोरडा

दुर्लभ आहे जन्म मानवीं
इथे न येईल पुन्हा पालवी
भले-चांगले करुनि घेई देवाचे हा धडा
गीत- मधुकर जोशी
संगीत - गोविंद पोवळे
स्वर - गोविंद पोवळे
गीत प्रकार - भावगीत