A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तू मी रे साजणा

तू मी रे साजणा !
कुणी कुणा हरविले, कुणी कुणा जिंकियले
खरं खरं सांग ना !

स्वप्‍नात मी दंग झाले
मी नवतीचा रंग ल्याले
लाटांवरी खेळ चाले
प्रीतीत मी चिंब न्हाले
डोलते मी तालावरी, लाज माझ्या गालावरी, लपविता राहिना !

हा मंद हा धुंद वारा
वेड्या मिठीचा शहारा
एकान्‍त देई इशारा
नौकेस लाभे किनारा
सारे सारे तुझ्यामुळे, सारे सारे तुला दिले, भोळी माझी भावना !
नवती - तारुण्याचा भर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.