तू नसता मजसंगे वाट
तू नसता मजसंगे वाट ही उन्हाची
संगतीस एकाकी वेदना मनाची !
मादक तो पुष्पराग श्वास ते सुगंधी
ओझरते स्पर्श खुळे ती नवखी धुंदी
विरहाची दीर्घ युगे मीलने क्षणाची !
क्षण यावे जवळ जरा फिरून दूर जावे
अर्ध्यावर तुटून सूर गीत ओघळावे
देव म्हणू दैव म्हणू योजना कुणाची?
संगतीस एकाकी वेदना मनाची !
मादक तो पुष्पराग श्वास ते सुगंधी
ओझरते स्पर्श खुळे ती नवखी धुंदी
विरहाची दीर्घ युगे मीलने क्षणाची !
क्षण यावे जवळ जरा फिरून दूर जावे
अर्ध्यावर तुटून सूर गीत ओघळावे
देव म्हणू दैव म्हणू योजना कुणाची?
| गीत | - | शान्ता शेळके |
| संगीत | - | मीना खडीकर |
| स्वर | - | उषा मंगेशकर |
| गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












उषा मंगेशकर