A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तू पाक सूरत कामिना

तू पाक सूरत कामिना कि दाहि बोटी मीना, हातामध्ये वीणा घेऊनिया गाती
तुला गुणिजन अवघे चहाती

नारी तुझी गजाची ग चाल, भांगी गुलाल मुलायस गाल
नवीनवती तू चंद्रकळा सवती, गायनामधे गुणिजन सविती
कंबर बारीकशी कुंद, मनामध्ये फुंद, मिजाजत धुंद खुले तव कांती
तुला गुणिजन अवघे चहाती

नाकी नथनी ग सर्जेदार, फुले अंगी जोहार ग फार
वनी जणू हे पळसतरू फुलले, गुणावर जन अवघे हे भुलले
म्हणे होनाजी बाळा गडे, अहो फाकडे, तुझी चहूकडे गुणाची हो ख्याती
तुला गुणिजन अवघे चहाती
नवती - तरुणी / तारुण्य.