A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तूं पापी अधमाधम

तूं पापी अधमाधम खलकषाय, निंद्य जगिं तुज काय ।
मूर्तिमंत तूं अपाय, संग्रहघट कुमतीचा हा त्वदीय काय ॥

करुनि विविध पातकांस । भोगिति जे नरकवास ।
प्रमुख त्यांत व्हावयास । कोण तुजशिवाय ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर-
नाटक - संगीत शारदा
चाल-फिरवि वदन
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कषाय - काढा.
खल - अधम, दुष्ट.
त्वदीय - तुझे.
मति - बुद्धी / विचार.