A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तू सप्तसूर माझे

तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा
गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा

जागेपणी मी पाहिले ते सत्य सारे देखणे
माझे मला आले हसू, आकाश झाले ठेंगणे
निमिषात सारे संपले, हुंकार ये प्रीतीचा

तू छेडिता माझ्या मना तारा अशा झंकारल्या
माझ्यासवे येताच तू, दाही दिशा गंधाळल्या
हे हासणे अन्‌ लाजणे हा खेळ ऊनपावसाचा
गीत - अशोक पत्की
संगीत - अशोक पत्की
स्वर- सुरेश वाडकर
गीत प्रकार - भावगीत
निमिष - पापणी लवण्यास लागणारा काळ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.