A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता (२)

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्‍न विनाशक मोरया
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया

मंगलमूर्ती तू गणनायक, वक्रतुंड तू सिद्धिविनायक
तुझिया द्वारी आज पातलो, ये इच्छित मज द्याया

तू सकलांचा भाग्य विधाता, तू विद्येचा स्वामी दाता
ज्ञानदीप उजळून आमुचा निमवी नैराश्याला

तू माता तू पिता जगी या, ज्ञाता तू सर्वस्व जगी या
पामर मी, स्वर उणे भासती तुझी आरती गाया