A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तू सुंदर चाफेकळी

तू सुंदर चाफेकळी । धमक ग पिवळी,
किती कांति तुझी कोवळी ।
तू नंदनवनीची चुकून अप्सरा आलिस या भूतळी ॥

स्वर्गात उमलली सूर्यफुलाची तू कळी ।
तू लावण्याची तिच्याच का पांकळी ।
वर्णिता तुला ही जीभ पडे पांगळी ।
हे काळीज माझे का चुरडुनी सदा तुझ्या पायदळी ॥