तू उदास का
लहर धुंद सागरी नजर धुंद लाजरी
नाचतो निसर्ग हा, तू उदास का?
हवेत मंद गारवा
दिशादिशांत गोडवा
स्वप्नरम्य या क्षणी तुझाच ध्यास का?
नभात रंग खेळती
हळूच मेघ बोलती
आज या चराचरी तुझाच भास का?
फुलून प्रीत राहिली
प्रिया तुलाच वाहिली
या प्रसन्न एकान्ती तू निराश का?
नाचतो निसर्ग हा, तू उदास का?
हवेत मंद गारवा
दिशादिशांत गोडवा
स्वप्नरम्य या क्षणी तुझाच ध्यास का?
नभात रंग खेळती
हळूच मेघ बोलती
आज या चराचरी तुझाच भास का?
फुलून प्रीत राहिली
प्रिया तुलाच वाहिली
या प्रसन्न एकान्ती तू निराश का?
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | पाच नाजूक बोटे |
गीत प्रकार | - | चित्रगीत, नयनांच्या कोंदणी |
Print option will come back soon