क्षणोक्षणीं रात्रंदिन
क्षणोक्षणीं रात्रंदिन
तुला आठवीन
आकारात ॐकारात
सगुणात निर्गुणात
तुलाच पाहीन
सुषुप्तीत जागृतीत
काळजाच्या स्पंदनात
तुलाच गाईन
भेट होता उराउरी
प्राण तुझ्या पायांवरी
वाहीन वाहीन
तुला आठवीन
आकारात ॐकारात
सगुणात निर्गुणात
तुलाच पाहीन
सुषुप्तीत जागृतीत
काळजाच्या स्पंदनात
तुलाच गाईन
भेट होता उराउरी
प्राण तुझ्या पायांवरी
वाहीन वाहीन
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | बाळ बर्वे |
स्वर | - | चंद्रशेखर गाडगीळ |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |
सुषुप्ति | - | गाढ झोप / ज्ञानशून्य अवस्था. |