तुझा नि माझा एकपणा
तुझा नि माझा एकपणा
कसा कळावा शब्दांना
दोन आपुल्या भिन्न आकृती
अंतरात पण एकच प्रीती
काव्य कळे ते नयनांना
जसा फुलातून गंध दरवळे
तसा मनातून स्नेह झुळझुळे
मिळे चेतना कणा कणा
चंद्र उगवता कमळे फुलती
प्रीत उमलता हृदये जुळती
ज्याच्या त्याला कळती खुणा
कसा कळावा शब्दांना
दोन आपुल्या भिन्न आकृती
अंतरात पण एकच प्रीती
काव्य कळे ते नयनांना
जसा फुलातून गंध दरवळे
तसा मनातून स्नेह झुळझुळे
मिळे चेतना कणा कणा
चंद्र उगवता कमळे फुलती
प्रीत उमलता हृदये जुळती
ज्याच्या त्याला कळती खुणा
गीत | - | शांताराम आठवले |
संगीत | - | केशवराव भोळे |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | भावगीत |
चेतना | - | जीवनशक्ती / अंत:प्रेरणा / स्फूर्ती / ऊर्जा. |
Print option will come back soon