A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझा सहवास प्रिया

तुझा सहवास! प्रिया!
निळा अवकाश, गती पवनास, फुला विकास
उरी उल्हास, प्रिया!
नवीन दिशा, नवीच उषा, नवा मधुमास!
तुझा सहवास!

बुजरी अजाण प्रीती
नवखी मनात भीती
अधरी अबोध गीती
नवखीच आस, नवे नि:श्वास!
तुझा सहवास!

तुझियासवेच नाथा
जग हे सुरम्य आता
सुमनी सुगंध आले
जग चांदण्यात न्हाले
तमही प्रकाश झाले
सुखवी जीवा नवा अभिलाष!
तुझा सहवास!
गीत- शान्‍ता शेळके
संगीत - सलील चौधरी
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट- सूनबाई
गीत प्रकार - चित्रगीत
अभिलाष(षा) - इच्छा, लालसा / तृष्णा.
उषा - पहाट.
तम - अंधकार.