A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझी अंगकांती रे

तुझी अंगकांती रे
रंगविती रानची फुले

ये नभीचा नीलिमा लोचना
नलिनी-पराग दे रसना
मयूर तुझी नाचवी पाऊले

इथे शोकि ही विरही बाला
रूपगर्विता असा का समज झाला?
ना सुमना जाणिले जाणिले

का रे अमृताचे बिंदू प्राशिले?
करी पुष्प-केसर चुरिले
कसे सांगू प्रेमिकाला प्रेम आपुले?
नलिनी - कमळ.
सुमन - फूल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.