A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझीमाझी प्रीत एकदा कधी

तुझीमाझी प्रीत एकदा कधी घडंल्‌ घडंल्‌ घडंल्‌
भर नवतीची आस नांदायची घरास
प्रेमाचं पाणी चढंल्‌ चढंल्‌ चढंल्‌

या गोष्टी अवघड झाल्यावर चौघडा
नावाचा चौघडा झडंल्‌ झडंल्‌ झडंल्‌
तुझीमाझी प्रीत एकदा कधी घडंल्‌ घडंल्‌ घडंल्‌

होनाजी कथन विरह पतन
प्रीतीचं रतनं जडंल्‌ जडंल्‌ जडंल्‌
तुझीमाझी प्रीत एकदा कधी घडंल्‌ घडंल्‌ घडंल्‌
गीत -
संगीत - वसंत देसाई
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट - अमर भूपाळी
गीत प्रकार - चित्रगीत
नवती - तरुणी / तारुण्य.