A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वाजत डंका दाही दिशेला

वाजत डंका दाही दिशेला
जग जिंकाया बाळ चालला
चौखुर वारू गती ग्रहगोला
जय ललकारी तिन्हीत्रिकाला

नयनमंदिरी बसुनी आता
चित्र रेखिते माझी ममता
दिसमासाने अरुण वाढता
बाळपणाला यौवन हसता
थोरपणाही हसू लागला

कर्तव्याची धाव तुफानी
जुलमी सत्ता पायी तुडवुनी
पराक्रमाची वज्र लेखणी
कोरू लागली अक्षर लेणी
तोरण बांधी गडागडाला