तुझीमाझी प्रीत जगावेगळी
क्षणांत कळली, क्षणांत जुळली,
भूल कशी पडली?
तुझीमाझी प्रीत जगावेगळी
शतजन्मांची नाती अपुली
बघता बघता अवचित जडली
किमया ही कसली
प्रेमिक आपण युगायुगांचे
प्रेमाला ना बंध कुणाचे
गाठ तिथे बसली
नाही ठावूक कुठे जायचे
तुझ्याच मागून मला यायचे
वाट आता ठरली
भूल कशी पडली?
तुझीमाझी प्रीत जगावेगळी
शतजन्मांची नाती अपुली
बघता बघता अवचित जडली
किमया ही कसली
प्रेमिक आपण युगायुगांचे
प्रेमाला ना बंध कुणाचे
गाठ तिथे बसली
नाही ठावूक कुठे जायचे
तुझ्याच मागून मला यायचे
वाट आता ठरली
गीत | - | मधुसूदन कालेलकर |
संगीत | - | शंकरराव कुलकर्णी |
स्वर | - | आशा भोसले, सुधीर फडके |
चित्रपट | - | पहिलं प्रेम |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |