A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझीमाझी प्रीत जमली

तुझीमाझी प्रीत जमली नदीकाठी
सांजपारी पडल्या चोरून भेटीगाठी

पिरतीचा ग तरू वाढं हळूहळू
तहानभूक हरू जिवलगासाठी
चाफ्याचा ग वास अन्‌ पिरतीचा ग ध्यास
लपंल्‌ कसा जरी केली आटाकाटी

इवलीइवली खोपी अंगण पुढं-पाठी
बिघाभर रान माझं वढ्याकाठी
तुझीमाझी प्रीत जमली नदीकाठी
सांजपारी पडल्या चोरून भेटीगाठी

पिकला हरभरा, गहू तरारला
चिमणा चांद आला माझ्या पोटी
नगं शेहरगाव नगं नाणं-सोनं
देवाघरचं लेणं अम्हांसाठी
गीत - योगेश
संगीत - एन्‌. दत्ता
स्वर- आशा भोसले
चित्रपट - प्रीत तुझी माझी
गीत प्रकार - चित्रगीत