तुझ्या डोळ्यांत न्यारं पानी
तुझ्या डोळ्यांत न्यारं पानी रं
बघु नकोस येड्यावानी रं
तुझ्या डोळ्याचा कळला भाव
माझ्या जिव्हारी बसला घाव
नग झुरूस मोरावानी रं
दुसर्याची झाली फुलबाग
धरूं नको मनामंदी राग
नको काढूस त्या आठवणी रं
जिवलगा जाइ सोडून
बालपणा नि आंबेवन
ते नदीचं झुळझुळ पानी रं
बघु नकोस येड्यावानी रं
तुझ्या डोळ्याचा कळला भाव
माझ्या जिव्हारी बसला घाव
नग झुरूस मोरावानी रं
दुसर्याची झाली फुलबाग
धरूं नको मनामंदी राग
नको काढूस त्या आठवणी रं
जिवलगा जाइ सोडून
बालपणा नि आंबेवन
ते नदीचं झुळझुळ पानी रं
गीत | - | |
संगीत | - | |
स्वर | - | बबनराव नावडीकर |
गीत प्रकार | - | भावगीत, नयनांच्या कोंदणी |