A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझ्या कांतिसम रक्तपताका

तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती

सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा
शुभद सुमंगल सर्वांआधी तुझी पाद्यपूजा
छेडुनी वीणा जागविते तुज सरस्वती भगवती

आवडती तुज म्हणुनी आणिली रक्तवर्ण कमळे
पाचमण्याच्या किरणांसम ही हिरवी दुर्वादळे
उभ्या ठाकल्या चौदा विद्या घेउनिया आरती

शूर्पकर्णका, ऊठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा
तिन्ही जगांचा तूच नियंता, विश्वासी आसरा
तुझ्या दर्शना अधीर देवा हर, ब्रह्मा, श्रीपती
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
ठाकणे, ठाके - थांबणे / स्थिर होणे.
पाचू (पाच) - एक प्रकारचे रत्‍न.
मूषक - उंदीर.
शूर्पकर्ण - गणपती. (शूर्प - सूप)
श्रीपती - विष्णू.
हर - शंकर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.