A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
त्या हें नमन करिं

त्या हें नमन करिं हरिला । अतुलबला ॥

भुजबलें वधि असुरभूपां । धीबलें कधिं कपटकूपां ।
धरित पशुमीनादिरूपां । मनुज कधिं झाला ॥

विविध मायावेष घेई । चढवि ललनारूप देहीं ।
गद्य जणुं संगीत होई । जगद्‌वनिं सजला ॥
गीत - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
संगीत - वझेबुवा
स्वर- स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
नाटक - वधूपरीक्षा
राग - बिहाग
ताल-रुपक
गीत प्रकार - नाट्यसंगीत, नांदी
असुर - राक्षस.
कूप - कुंपण.
धीमान्‌ (धी) - बुद्धीमान.
भूप - राजा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.