तुझ्या पाहण्याचा अर्थ
तुझ्या पाहण्याचा अर्थ लावण्यात
दंगलेले मन माझे दिनरात
तुझ्या चालण्याचा अंबेराई डौल
हिंदळत गाली हृदयीचा कौल
रूपगर्व घाली मानेवरी आळे
ज्वानीचे तुझ्या ग धुंदफुंद डोळे
अधरीची तुझ्या ग वाजता बासरी
मूर्तीमंत होई गोकुळ सामोरी
तुझ्या संगतीचा गडे तो सुवास
कधी लाभायाचा जीवीच्या फुलास
दंगलेले मन माझे दिनरात
तुझ्या चालण्याचा अंबेराई डौल
हिंदळत गाली हृदयीचा कौल
रूपगर्व घाली मानेवरी आळे
ज्वानीचे तुझ्या ग धुंदफुंद डोळे
अधरीची तुझ्या ग वाजता बासरी
मूर्तीमंत होई गोकुळ सामोरी
तुझ्या संगतीचा गडे तो सुवास
कधी लाभायाचा जीवीच्या फुलास
| गीत | - | पी. सावळाराम |
| संगीत | - | |
| स्वर | - | विठ्ठल शिंदे |
| गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












विठ्ठल शिंदे