तुझ्या पंखावरूनि या
तुझ्या पंखावरूनि या मला तू दूर नेशिल का?
तुझ्या गे भावसुमनांचा मला तू गंध देशिल का?
गंध नवा धुंद करी, हवेत हा गारवा
साथ तुझी त्यात अशी मला मिळे राजिवा
प्रीतीच्या स्वप्नी सदा अशीच येशील का?
आज नवे गीत हवे सांगे मनोभावना
आज दिसे विश्व कसे नवे नवे लोचना !
नित्य असा सांग सदा माझाच होशिल का?
तुझ्या गे भावसुमनांचा मला तू गंध देशिल का?
गंध नवा धुंद करी, हवेत हा गारवा
साथ तुझी त्यात अशी मला मिळे राजिवा
प्रीतीच्या स्वप्नी सदा अशीच येशील का?
आज नवे गीत हवे सांगे मनोभावना
आज दिसे विश्व कसे नवे नवे लोचना !
नित्य असा सांग सदा माझाच होशिल का?
| गीत | - | गंगाधर महाम्बरे |
| संगीत | - | एन्. दत्ता |
| स्वर | - | उषा मंगेशकर, रवींद्र साठे |
| चित्रपट | - | प्रीत तुझी माझी |
| गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
| राजीव | - | कमळ / प्रिय. |
| सुमन | - | फूल. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












उषा मंगेशकर, रवींद्र साठे