तुझ्या प्रीतीचें दु:ख मला
तुझ्या प्रीतीचें दु:ख मला दाउं नको रे
वधुनिं जाई प्राण घेई ठेउं नको रे
याचे ममतेचा लोभ मला कळला आता
कुण्या ठिकाणीं आहे जाउन लावा पत्ता
तिथें चालत जाईन आप आंगे स्वतां
जाऊन सांगा की रानभरीं होउं नको रे
जगीं सांगतात प्रीत पतंगाची खरी
झड घालुन देतो प्राण दीपकाचे वरी
हें मी सांगत असतांना कां गे पडले भरीं
रत्न टाकुन पदरांत गार घेऊं नको रे
वधुनिं जाई प्राण घेई ठेउं नको रे
याचे ममतेचा लोभ मला कळला आता
कुण्या ठिकाणीं आहे जाउन लावा पत्ता
तिथें चालत जाईन आप आंगे स्वतां
जाऊन सांगा की रानभरीं होउं नको रे
जगीं सांगतात प्रीत पतंगाची खरी
झड घालुन देतो प्राण दीपकाचे वरी
हें मी सांगत असतांना कां गे पडले भरीं
रत्न टाकुन पदरांत गार घेऊं नको रे
गीत | - | शाहीर होनाजी बाळा |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | अमर भूपाळी |
राग | - | यमन |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |