A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझ्याचसाठी तुझे घेउनी

तुझ्याचसाठी तुझे घेउनी नाव
सोडिला कायमचा मी गाव

गाव-शिवेवर आस थांबली
तुझ्याचसाठी दृष्ट लांबली
अंधारी ही बुडे साउली
तूच प्रकाशा वाट- पुढती दाव

गात गुणांची तुझी आरती
मनात पूजिन तुझीच मूर्ती
संकट येता हाके पुढती
कृष्णापरी तू धाव- सखीला पाव
गीत- पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभू
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट- पावनखिंड
गीत प्रकार - चित्रगीत
शीव - हद्द / मर्यादा.