A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझ्याचसाठी राजसा

तुझ्याचसाठी राजसा
मी विनवणी करिते थांब ना
माझी रातदिन झुरते काया
तुझ्या मूठभर पैशासाठी रे
माझी लाखाची प्रीत जाई वाया

या झाडाचे हे सुंदरसे पान मी तोडुनिया
या नाजुकशा किरकणीने ते दुमडुनिया
मी केली त्याची शिट्टी रे
अन्‌ वाजविली तुजसाठी रे
तू ऐकलीस नाही राया
तुझ्या मूठभर पैशासाठी रे
माझी लाखाची प्रीत जाई वाया

वाट बघुनी डोळे शिणले
प्रीत कशी तुज अजुनी नकळे
रिमझिम रिमझिम मेघ बरसले
तरुवर सारे खुलुनी बहरले
हे दु:ख कुणाला सांगू रे
मन माझे आहे भाबडे
घुटमळते तुज सांगाया
तुझ्या मूठभर पैशासाठी रे
माझी लाखाची प्रीत जाई वाया