A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझ्यात जीव गुंतला

तुझ्यात जीव गुंतला
कळेल का कधी तुला?

तुझेच स्वप्‍न लोचनी
तुझेच नाव चिंतनी
इथे तिथे सभोवती
तूच भासशी मला..

तुला न हे कळे परि
मी कशी जळे उरी
वेड हे न सोसते,
परि न सोडते मला..
गीत- सुधीर मोघे
संगीत - आनंद मोडक
स्वर - जयश्री शिवराम
चित्रपट- लपंडाव
गीत प्रकार - चित्रगीत