तुला बघुन पदर माझा पडतो
तुला बघुन पदर माझा पडतो
डोळ्याचा पारवा उडतो
शालू हिरवा फुलांचा साज
तुझ्यासाठी केला मी आज
आली वयात पहिली लाज
रंग गुलाबी गाली चढतो
अडविता प्रीतीने वाटा
गोर्या अंगी कोवळा काटा
जाता गळून मनाचा ताठा
रूप गुणाचा उजेड पडतो
तुझ्या मनाचा घेऊन ऐना
आली जिवाची हासत मैना
नाचता बांधुनी पैना
देहाचा मोर बाई डुलतो
डोळ्याचा पारवा उडतो
शालू हिरवा फुलांचा साज
तुझ्यासाठी केला मी आज
आली वयात पहिली लाज
रंग गुलाबी गाली चढतो
अडविता प्रीतीने वाटा
गोर्या अंगी कोवळा काटा
जाता गळून मनाचा ताठा
रूप गुणाचा उजेड पडतो
तुझ्या मनाचा घेऊन ऐना
आली जिवाची हासत मैना
नाचता बांधुनी पैना
देहाचा मोर बाई डुलतो
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | स्नेहल भाटकर |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | या मालक |
गीत प्रकार | - | चित्रगीत, नयनांच्या कोंदणी |
पारवा | - | कबुतराची एक जात किंवा त्याच्या रंगाचा. |
Print option will come back soon