तुला ते आठवेल का सारे
तुला ते आठवेल का सारे?
दंवात भिजल्या जुईपरी हे मन हळवे झाले रे
तुझ्या करातिल मोरपीस ते
अजून गालांवरुनी फिरते
बनातुनी केतकिच्या येती सुगंध शिंपित वारे
त्या तरूवेली, तो सुमपरिमळ
झर्यातली चांदीची झुळझुळ
आठवणींच्या चिंचा गाभुळ रुचतिल काय तुला रे?
ते सारे मी हृदयी जपते
उगीच लाजते उगीच हसते
हृदयामधल्या देवासाठी हवेत का देव्हारे?
दंवात भिजल्या जुईपरी हे मन हळवे झाले रे
तुझ्या करातिल मोरपीस ते
अजून गालांवरुनी फिरते
बनातुनी केतकिच्या येती सुगंध शिंपित वारे
त्या तरूवेली, तो सुमपरिमळ
झर्यातली चांदीची झुळझुळ
आठवणींच्या चिंचा गाभुळ रुचतिल काय तुला रे?
ते सारे मी हृदयी जपते
उगीच लाजते उगीच हसते
हृदयामधल्या देवासाठी हवेत का देव्हारे?
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | भावगीत |
गाभुळणे | - | पक्व होत जाणे, पाडास येणे. |
तरुवर | - | तरू / झाड. |
सुम | - | फूल. |