तुम्ही काय म्हणता याचा
तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाही
मी जिवंत आहे- माझा हा प्रमाद नाही !
मैफलीत मंबाजींच्या का म्हणून बोलू?
कुणालाच कोणाचीही इथे दाद नाही
हा अथांग सागर उसळे जरी यातनांचा
परत मी घरी जाणारा सिंदबाद नाही
कुणी घाव केला तेव्हा मला आठवेना
पुढे काय झाले माझे? मला याद नाही !
तुला मीच रडतारडता धीर देत आहे
वादग्रस्त माझे अश्रू ह्यात वाद नाही !
सावकाश आयुष्याचा खेळ खेळलो मी
बाद होत गेले सारे, मीच बाद नाही !
मी जिवंत आहे- माझा हा प्रमाद नाही !
मैफलीत मंबाजींच्या का म्हणून बोलू?
कुणालाच कोणाचीही इथे दाद नाही
हा अथांग सागर उसळे जरी यातनांचा
परत मी घरी जाणारा सिंदबाद नाही
कुणी घाव केला तेव्हा मला आठवेना
पुढे काय झाले माझे? मला याद नाही !
तुला मीच रडतारडता धीर देत आहे
वादग्रस्त माझे अश्रू ह्यात वाद नाही !
सावकाश आयुष्याचा खेळ खेळलो मी
बाद होत गेले सारे, मीच बाद नाही !
दाद | - | दखल / ओळख. |
प्रमाद | - | अपराध / चूक. |
मंबाजी | - | मंबाजी हा गोसावी ब्राह्मण, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा समकालीन. तुकाराम महाराजांचा तो द्वेष व मत्सर करायचा. |
विषाद | - | दु:ख. |
सिंदबाद | - | अरेबियन नाइट्स हा मध्यपूर्व व दक्षिण आशियातील एक हजार व एक लोककथांचा अरबी भाषेतील कथासंग्रह आहे. यात सिनबाद (सिंदबाद) या (काल्पनिक) दर्यावर्दी पात्राची कथा येते. त्याने पूर्व आफ्रिका ते दक्षिण आशियाच्या सात साहसी समुद्र सफरी केल्या. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.