A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
त्या चित्तचोरट्याला का आपुले

त्या चित्तचोरट्याला का आपुलें म्हणूं मी?
स्मृतिजाल आसवांचे दिनरात का विणूं मी

सहजीं करीं धरावे, नख लाउनी खुडावे
कीं फूल मालतीचें बागेतलें जणूं मी

नजरेंत नीट आलें, मी घेतले निशाण
हलतांच पापणीचा हुकला अमोघ बाण
ते मीनकेतनाचें ग मोडिलें धनू मी

आलें मनांत माझ्या किति साळसूद बाई
मी पाहिलें तरीही ते पाहणार नाहीं
राजीवलोचनाला ग वाहिली तनू मी
गीत - राजा बढे
संगीत - मधुकर गोळवलकर
स्वर- माणिक वर्मा
राग - मिश्र खमाज
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- १९५३
मीनकेतन - मदन, कामदेव.
राजीव - कमळ / प्रिय.

 

Print option will come back soon