त्या क्रूर लाल ज्वाळा
त्या क्रूर लाल ज्वाळा
आवर्त त्यात सुटले
वणव्यात बाग जळला
आता गुलाब कुठले
केला कशास तेव्हा
आकांत पाखरांनी
हृदयात आज त्यांचे
पडसाद खोल उठले
झाले उजाड अवघे
उरले न शेष काही
राखेत जीवनाच्या
सारेच रंग विटले
ठेऊ कशास मागे
भावार्थ अक्षरांचे
सुचले न तो मनाचे
उघडून दार मिटले
आवर्त त्यात सुटले
वणव्यात बाग जळला
आता गुलाब कुठले
केला कशास तेव्हा
आकांत पाखरांनी
हृदयात आज त्यांचे
पडसाद खोल उठले
झाले उजाड अवघे
उरले न शेष काही
राखेत जीवनाच्या
सारेच रंग विटले
ठेऊ कशास मागे
भावार्थ अक्षरांचे
सुचले न तो मनाचे
उघडून दार मिटले
गीत | - | गुरुनाथ शेणई |
संगीत | - | भानुकांत लुकतुके |
स्वर | - | रामदास कामत |
गीत प्रकार | - | भावगीत |
शेष | - | बाकी, अवशिष्ट. |