A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उदो उदो मागते अंबाबाईचा

उदो उदो उदो मागते अंबाबाईचा जोगवा हो अंबाबाईचा जोगवा
पालवते लिंबाचा टहाळा, देवीला हो जागवा
कुणी देवीला हो जागवा बाई देवीला हो जागवा

(कळून येईना पाव)[१] देवीचा भाव तिचा परभाव
कुणाला ठावं होमामंदी जन्मुनी रहाणं तुळजापूर गाव
पालवते लिंबाचा टहाळा, देवीला हो जागवा
कुणी देवीला हो जागवा बाई देवीला हो जागवा

मळवट भरला भुत्या रंगला कवडीमाळा घातल्या गळा
पायामंदी घालुनी वाळा नाच रंगुनी यावा
पालवते लिंबाचा टहाळा, देवीला हो जागवा
कुणी देवीला हो जागवा बाई देवीला हो जागवा

आतुरपणाने अंग उघडे रक्त जरी उडे नाचती पुढे
शुक्रवार-मंगळवार देवीचा (प्रसाद तुम्ही हा मिळवावा)[१]
पालवते लिंबाचा टहाळा, देवीला हो जागवा
कुणी देवीला हो जागवा बाई देवीला हो जागवा
गीत - अनिल गोगटे
संगीत - निशिकांत भारती
स्वर- गीता दत्त
गीत प्रकार - या देवी सर्वभूतेषु
  
टीप -
• [१] - या शब्दांच्या अचुकतेविषयी शंका आहे. आपल्याला समजल्यास संपर्क करा.
टहाळा - पानासकट फांदी.
परभाव - प्रभाव.
पालवणे - पदर घालणे.