A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उद्याचा कोण धरी

घोटापाठी घोट सुखाचा पिऊन घे राजसा
उद्याचा कोण धरी भरवसा

एकच हसणे हसून चुकते वेलीवरची कळी
एकच उसळी घेऊन फुटती डोंगरलाटा जळी
एक रात्र ही त्या उंचीची जवळ नशेचा शिसा
उद्याचा कोण धरी भरवसा

फूल शेजेवर सुगंध रचतो मऊपणाचे थर
खिडकीमधुनी झुळूक उडवी चैत्राचे अत्तर
नको विजेचा दिवा पडु दे चांदाचा कवडसा
उद्याचा कोण धरी भरवसा
शेज - अंथरूण.
शिसा - मोठी बाटली.