A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उघडि नयन रघुनंदन

उघडि नयन रघुनंदन वनविहंग बोले

चंद्रकिरण शीतल होत
चकवी प्रियभेट घेत
विविधमंद सुटत पवन पल्लव द्रुम डोले

प्रातभानु येइ वरी
रजनीचा तिमिर हरी
गुंजारव करित भृंग फुलती कमळबाळे

आनंदे मनमिलिंद
निरखि प्रभुमुखारविंद
उधळित रवि अरुणरंग उदयाचलि आले

ब्रह्मादिक करिति ध्यान
सुरनरमुनि करिति गान
उठी रे उठी रघुनाथा उघडि आता डोळे
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
अरविंद - कमळ.
उदयाचल - ज्याच्या आडून चंद्रसूर्याचा उदय झालेला दिसतो तो पर्वत.
गुंजारव - भुंग्याचा गुणगुण नाद.
द्रुम - वृक्ष, झाड.
भानू - सूर्य.
मिलिंद - भ्रमर, काळा भुंगा.
विहंग - विहग, पक्षी.
सुर - देव.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.