A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उजळून आलं आबाळ

उजळून आलं आबाळ रामाच्या पारी
गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी

सुर्व्यासंगं ईर्सा करतोय अंदार गा अंदार
उजेड त्येला गिळतो म्हणून बेजार गा बेजार
पापाच्या म्होरं पुन्याई ठरतीया भारी

कोंबडा बोलतो ग कोंबडा बोलतो ग
उगवतीच्या डोईवरी तुरा सुर्व्याचा डोलतो ग

नारायनाचं रूप खेळवी धरतीला ग धरतीला
अन्‌ इरसरीनं चांद चमकवी रातीला गा रातीला
ही जिद्द कल्यानापायी असावी सारी

पाय उचला ग सयांनो, जाऊ पान्याला बायांनो
किस्‍न वाजवी पावा ग बावरल्या नारी

तुमच्या आधी पाखरं उठली घरट्यात गा घरट्यात
गायवासरू बैल जागली गोठ्यात गा गोठ्यात
किस्‍नाचं रूप हे आलं चालुनी दारी

नंदीराजाच्या जोडीनं मळा शिपला शिपला
डोळा दीपला दीपला आज आकरीत घडं

खंड्याला वडं रं बंड्याला वडं रं..

भगवंतानं दान दिलं हे गावाला गा देवाला
मूठपसा हे दान पावलं देवाला गा देवाला
किरपेला भक्तीची जोड अशी ही न्यारी
गीत- जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर - सुरेश वाडकर , शोभा जोशी
चित्रपट- ईर्षा
गीत प्रकार - चित्रगीत
पावा - बासरी, वेणु.

 

Random song suggestion
  सुरेश वाडकर, शोभा जोशी