A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उमलली एक नवी भावना

उमलली एक नवी भावना!
नसे वेगळी सखे तुझ्याहून माझी संवेदना!

अघटित गेले अवचित हो‍ऊन
विसरुनी गेले मी माझेपण
रेशीमधागे गुंतविणार्‍या प्रीतिच्या या खुणा!

वसुंधरेच्या कणाकणांतून
आकाशाच्या अणुरेणूतून
एक आगळी रसरसलेली प्रकटे नवचेतना!

हात असावे असेच हाती
अचल ध्रुवापरी अपुली प्रीती
मुक्ती नको मज प्रीतीसाठी जन्म पाहिजे पुन्हा!
आगळा - अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण.
चेतना - जीवनशक्ती / अंत:प्रेरणा / स्फूर्ती / ऊर्जा.

 

  सुधीर फडके, सुमन कल्याणपूर