थोराहुनही थोर श्रीहरी
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे
थोराहुनही थोर
श्रीहरी गोकुळचा चोर
सकल सुरांना वंदनीय हा
असुरांना शिरजोर
चंद्रवदन तो देवकीनंदन
राधेचा चित्चोर
देखुनी ज्यातें प्रमोदित होती
भाविक नेत्र-चकोर
मृदू अधरांवर मुरली सुस्वर
तरीही श्रीधर समर धुरंधर
जरी लोण्याहून मऊ तरीही
वज्राहून कठोर
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे
थोराहुनही थोर
श्रीहरी गोकुळचा चोर
सकल सुरांना वंदनीय हा
असुरांना शिरजोर
चंद्रवदन तो देवकीनंदन
राधेचा चित्चोर
देखुनी ज्यातें प्रमोदित होती
भाविक नेत्र-चकोर
मृदू अधरांवर मुरली सुस्वर
तरीही श्रीधर समर धुरंधर
जरी लोण्याहून मऊ तरीही
वज्राहून कठोर
गीत | - | विद्याधर गोखले |
संगीत | - | नीळकंठ अभ्यंकर |
स्वर | - | सुधीर फडके |
नाटक | - | गोकुळचा चोर |
राग | - | यमन |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, नाट्यसंगीत |
असुर | - | राक्षस. |
चकोर | - | चांदणे हेच ज्याचे जीवन असा एक पक्षी. |
प्रमोद | - | आनंद. |
सुर | - | देव. |
पृथक्
हा श्रीमद्भगवद्गीतेमधील श्लोक आहे. (अध्याय ४, श्लोक ८)
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥८॥
परित्राणाय, साधूनाम्, विनाशाय, च, दुष्कृताम्,
धर्मसंस्थापनार्थाय, संभवामि, युगे, युगे ॥८॥
कारण-
साधूनाम् = साधू पुरुषांचा
परित्राणाय = उद्धार करण्यासाठीं
च = आणि
दुष्कृताम् = दुष्ट कर्म करणार्यांचा
विनाशाय = नाश करण्यासाठीं (तसेंच)
धर्मसंस्थापनार्थाय = धर्माची संस्थापना करण्यासाठीं
युगे युगे = युगोंयुगीं
संभवामि = मी प्रगट होतों.
(संपादित)
'श्रीमद्भगवद्गीता' या ग्रंथातून.
सौजन्य- गीताप्रेस, गोरखपूर
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.