A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उमटली रामाची पाऊले

गोदाकाठी माझ्या इथल्या
प्रभुजी अवतरले
उमटली रामाची पाऊले

फिरत असशील तू वनवासी
कंदमुळे ती वनी शोधिसी
कधी भुकेले कधी थकलेले
रामप्रभु राहिले

कांचनमृग तो पाहून येथे
पाठलाग तू केला येथे
जानकी तुझी हरण करिता
अश्रू ओघळले

जागोजागी कणाकणांतुनि
आसू प्रभुचे इथे सांडुनी
जानकीस त्या शोधत फिरले
रामप्रभु चालले
गीत - योगेश्वर अभ्यंकर
संगीत - गोविंद पोवळे
स्वर- जानकी अय्यर
गीत प्रकार - राम निरंजन, भावगीत
  
टीप -
• गोविंद पोवळे यांनी आकाशवाणीसाठी हे वयाच्या १६व्या संगीत दिलेले हे पहिले गीत तसेच कवी योगेश्वर अभ्यंकर यांचे ध्वनिमुद्रीत झालेले पहिले गीत.
कांचन - सोने.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.